सामान Check-in आणि बाकीचे सोपस्कार पार पडल्यावर खुर्च्यावर बसले. बस किंवा रेल्वे स्थानकासारखच वातावरण होतं ते. फरक जाणवत होता तो श्रीमंतीचा, साफसफाईचा, शो-ऑफचा. जगाच्या पाठीवर कुठेही जा काही गोष्टी बदलणार नाहीत, त्या इथेही होत्या. लहान मुलांची इकडून तिकडे पळापळी , मोठ्यांचे कॉफ्फी बर्गर खाणे आणि कुठे आसुसलेले डोळे. माझ्या सोबत मित्र मैत्रिणी होत्या. गप्पा, थट्टा मस्करी सुरु होती. बोलण्यासाठी विषय आपोआप मिळत होते. वेळ कसा जात होता ते कळाल नाही.
काही काम नसेल तर मन खाण्यात तरी गुंतवाव. पुण्याहून सकाळी ६ वाजता निघालो होतो फक्त चहा
घेऊन. खालापूर मध्ये आम्ही सगळ्यांनी चहा शिरा पोहे खाल्ले होते पण तरी ! Sandwich outlet वर लिहिलेली नावं ओळखीची होती. मग "तू काय
घेणार, आणि तू, मी ... " अशी order दिली. आधीच बनवून ठेवलेल्या Sandwich,burger ला microwave
मध्ये २ मि. गरम केल गेल आणि आमची order place झाली. किमतीबाबत न बोललेच चांगला. एका मित्रानी Coffee घेतली होती, Cappuccino. आणि त्याने ती फेकून दिली ! ६५ रुपयांची Cappuccino इतकी वाईट ?
असो आम्हाला CCD ची सवय लागली आहे आणि विमानतळावरची CCD ती CCD नव्हेच. त्या कॉफ्फी वर आमची चर्चा सुरु झाली. आम्ही सगळे ऑफिसमधील machine ची कॉफ्फी तरी चांगली या मुद्द्या वर थांबलो. कदाचित आम्ही नवखे, आम्हाला काय कळत कॉफ्फी मधला अस तर नव्हे ना?
आता उड्डाणाला अर्धा तास बाकी होता. आम्ही सगळे Checkin साठी पुढे गेलो. Automated checking नसल्यामुळे तिथे खूप मोठी रांग होती. ' छत्रपती
शिवाजी विमानतळ ' मी जशी सुरक्षाप्रणाली अपेक्षित करत होते असे काही नव्हते
तिथे. gate check-in मधून कोणी पण फसवून येवू शकत. सगळ्याचं तपासून झाल्यावर पुन्हा खुर्च्या. आम्ही College मध्ये होतो
तेव्हा 'तीन काळ्या जोडून असलेल्या खुर्च्यांना 'Airport च्या खुर्च्या'
उगाचच म्हणत नव्हतो. आम्ही तिथेच पत्ते सुरु केले. स्थळ काळ याच बंधन आम्हा मान्य नाही.
'Dirty Seven ' चे दोन-तीन डाव झाले असतील, आमच्या flight ची announcement झाली. Boarding पास घेवून आम्ही पुन्हा रांगेत उभे राहिलो.
'Dirty Seven ' चे दोन-तीन डाव झाले असतील, आमच्या flight ची announcement झाली. Boarding पास घेवून आम्ही पुन्हा रांगेत उभे राहिलो.
चित्रपट पहिल्यामुळे माहित होत दरवाजा पलीकडे गेल्यावर लगेच विमान उभं नसत . एक बस येते, तुम्हा सगळ्यांना त्यातून विमानात नेलं जात. बोर्डिंग पास दाखवून आम्ही बस साठी उभे राहिलो. २ मिनिटात एक मस्त भव्य बस आली आणि आम्हा सर्वांना घेवून विमानाकडे निघाली. आणि अश्या पद्धतीने मी विमानाजवळ पोहचले.
तेव्हा असचं काही तरी मनात येत होतं . अ,ब,क एका बाजूला. ड,ए,फ दुसऱ्या बाजूला अशी आसन व्यवस्था होती. Window seat ची अपेक्षा धरली नव्हती पण ती नशिबी होती :) विमानात धुरांचे लोट येत होते. ते air conditioner चे होते. पांढरी शुभ्र हवा, थंडगार हवा. एकाद्या परी राज्यात आल्यासारखे वाटत होते.
हवाईसुंदरीने आपत्कालीन व्यवस्थापन यावर ५ १० मिनिटं संभाषण केलं. खिडकीतून खाली पाहायला मस्त वाटत होत. विमानाने जेव्हा take-off केल तेव्हा पोटात गोळा आला होता, जसा झोका खेळताना येतो. विमानाचा वेग आणि स्थिथी सुरुवातीला जाणवत होती. एकदाच विमान आकाशात उंच गेल मग खिडकीतून खाली पाहूनसुद्धा कळत नव्हत की आपण कुठे आहोत . जे दिसत होते ते होते पांढरे शुभ्र ढग, आखीव रेखीव जमीन, आयताकार तुकडे, भुरकट जमीन तर कुठे हिरवाई नेसलेली टेकडी ( डोंगर असतील ) आणि मधेच शांत वाहणारी निळी जांभळी नदी. ढगांवरून उड्या मारू वाटत होते.
दूर दूर पर्यंत हाच निसर्ग होता सोबतीला.





No comments:
Post a Comment