Sunday, July 19, 2015
वेळ
रविवारची बातमी "शास्त्रज्ञांना प्रकाशाचा वेग कमी करण्यात यश"
हे वाचून मन वेगाने धावू लागले. मन हे एक फुलपाखरू आहे कधी सुंदर फुलाभोवती तहान भूक स्थळ काळ यांचे भान हरवून बागडत राहील तर कधी वेगाने धावणारा घोडा बनून सात समुद्र सात पर्वत पार करून जाईल.
असो, शास्त्रज्ञानी लावलेल्या शोधाने माझा मनाचा वारुक उधळला.
पृथ्वी सुर्यापासून ८ "light min" दूर आहे. हे प्रमाण जर कमी-जास्त असेल तर?
आपोआपच सुर्य किरण हळू आली असतील तर?
"Physics" चे सोडवलेली सगळी गणितं चुकली कि काय ?
आधीच परिभ्रमना बाबतीत शंका कुशंका होत्याच, त्यात अजून एक भर.
जेव्हा आपण विमानात बसून पृथ्वीच्या परीवालानाच्या दिशेने जातो तेव्हा आपण मूळ वेळेच्या पुढे जातो नि जेव्हा परीवालानाच्या विरुद्ध दिशेने जातो तेव्हा आपण मूळ वेळेच्या मागे जातो. म्हणजे नेमका आपल्या आयुष्यात "Grace" वेळ जमा होते का ? युरोपिअन लोक "Summer time" नुसार घड्याळ पुढे मागे करतात. मग "quartz" वर अवलंबून असणारे Share market , बँका कश्या चालतात.
एका तपाहून जास्त दिवस झालेत मी घड्याळ वापरते पण किती घड्याळ वापरून झालेत याचे मोज माप नाही. दहावीत मिळालेले, बारावीत मिळालेले, दादांनी ओवाळणीत दिलेले, मी पहिल्यांदा विकत घेतलेले, दाजींनी दिलेले, मित्रांनी दिलेले, समारंभात मिळालेले असॆ सगळे बाराच्या भावात गेले.
नुकतच घेतलेलं घड्याळ तर २ महिने सुद्धा नीट चालल नाही. देव जाणो घड्याळ नाही माझी वेळच चुकत असेल तर !
माझी तर खात्रीच पटली आहे की किती वाजले हे बघणेच चुकीच ! कोण जाणो घड्याळ खराब झाल असेल किंवा वेळच त्याच्या गती नुसार चालत नसेल.
Subscribe to:
Comments (Atom)
